दूरध्वनी - ०२२-२४९२१८२७
तेली सेवा समाज, मुंबई (स्थापना :१९४९)
(धर्मादाय आयुक्त नोंदणी क्र. ए -१२०३ (मुंबई) दि .२९/४/१९५३)
इतिहास
तेली स्वयंसेवक पथक,लोअर परेल मुंबई ४०००१३

तारीख ५ माहे डिसेंबर १९४९ रोजी खालील ज्ञाती बांधवांतर्फे एक सभा घेऊन आपल्या ज्ञातीची संघटना व्हावी व एकमेकांविषयी आदर बुद्धी उत्पन्न होऊन त्या संघटनेचा फायदा आपल्या ज्ञाती बांधवास योग्य तो मिळावा व परस्परात ज्या द्वेश भावना असतील त्या नाहीशा होऊन आपल्या ज्ञातीचे कार्य सुरळीत चालावे व तिचे संगोपन निःप्रह बुद्धीने व्हावे म्हणून ही सभा वरील तारखेस,राजेश्री ‘रामचंद्र शिवशेट वायंगणकर’ आज वस्ती राहणार मानाजी राजुजी चाळ,नं.६, खोली नं.७७, सनमिल रोड, मुंबई ४०००१३ येथे घेण्यात आली.त्यावेळी जे प्रथम कार्यकारी मंडळ निवडण्यात आले ते खालील प्रमाणे (सभेस निरनिराळ्या गावचे ३६ लोक हजर होते.)

श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई

जोडोनियां धन उत्तम व्यवहारे (स्थापना दि.१-१-१९६६)

आपल्या या मुंबई शहरात आपल्यासाठी एखादी सहकारी पतपेढी असावी असे कार्यकर्त्यांना अनेक वर्ष वाटत होते.जिकडे तिकडे समाजिक कार्याबद्दल उदासीनता व कार्यकर्त्यांच्या अभावामुळे पतपेढी सारखे नवीन जबाबदारीचे कार्य अंगावर घेऊन पेलणें मोठे धाडसाचे होते, हे आपण जाणताच आहांत.सध्यां आपल्या महाराष्ट्रात सहकाराचे पर्व सुरु आहे.त्या पर्वाचा उपयोग करून घेतला नाही तर आपल्या सारखे निष्क्रिय व वायफळ बडबडे आपणच ठरू !!

सहकारी चळवळीचा स्तुत्य कार्यामधून प्रेरणा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये नवीन दृष्टी नवा जोम व वैशिष्टयपूर्ण काम करण्याची जिद्द पूर्ण झाली. या निःस्वार्थी व उस्फुर्त कार्यकर्त्यांच्या मनात समाज बांधवांची आर्थिक गरज काही प्रमाणात दूर करण्यासाठी व त्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्न योग्य तऱ्हेने हाताळण्यासाठी सहकारी पतपेढी अत्यंत निकडीचे वाटले,म्हणून कार्यकर्त्यांनी एक वर्ष सहकारी पतपेढीचा अनुभव पाहून आपण या क्षेत्रात कुठपर्यंत कार्य करू शकतो याचा अंदाज घेतला.



सर्व श्री यशवंत हरी आडिवरेकर,सदाशिव नारायण रसाळ,रघुनाथ गोविंद राणे, कु.विश्वेश्वर नामदेव कांदळगावकर,मुकुंद सखाराम कामतेकर,दत्ताराम रामचंद्र राणे, अर्जुन भागोजी मटकर,यशवंत शंकर पावसकर,वसंत सिताराम कुरलकर,शेबा अनंत शेलार,शांताराम गोविंद किंजवडेकर,धोंडू अर्जुन तळावडेकर.

दि.१ जानेवारी१९६६ या शुभदिनी ‘श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित’ स्थापन करण्यात आली.या पाच वर्षांच्या कालवधीत ८५३ सभासद झाले आहेत भाग भांडवल रु.८५,०००/-मुदत ठेव ३५,०००/- प्रती वर्षी ४००/५०० सभासद फायदा घेत आहेत.वार्षिक उलाढाल रु.२,१२,०००/-आहे.

आज या पतपेढीने गरीब व गरजू समाज बांधवांचे संसार सावरले जात आहेत.गरिबांची लग्नकार्ये,शाळा-कॉलेजातील फी भरणें,कर्ज मुक्ती व छोटया उदयोग धंदेवाल्यांना आसरा लाभला आहे.त्या सर्वांचे आशीर्वाद संस्थेच्या पाठीशी आहेत.यात समाजातील छोटया मोठया उदयोगपतींनी लक्ष घातल्यास सहकारी बँक काढल्यास वेळ लागणार नाही.तसेच समाजातील मंडळींचा पैसा समाजातच खेळत राहून त्यांच्या उदयोग वाढीस मिळेल व समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास विलंब लागणार नाही.

समाजांतील व्यक्तीनें राजकीय क्षेत्रात पदार्पण केल्याशिवाय त्या समाजास प्रगतीचा टप्पा लवकर गाठता येत नाही हे ओळखून विविध राजकीय पक्षांत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची व समाज सेवकांची एक सभा दि.२४.१२.१९६७ रोजी श्री.नाना सखाराम कुणकेश्वरकर यांचे अध्यक्षतेखाली कार्यालयांत झाली त्यांत समाजातील कार्यकर्ते श्री.आत्माराम दाजी जामसंडेकर यांना नगरपालिकेच्या निवडणूकीत सर्वतोपपरि व सहाय्य करण्याचे ठरले होते अशा तऱ्हेनें विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांना उत्तेजीत करून समाज प्रगती पथावर आणण्याचे प्रयत्न चालू आहे.

आपल्या समाज बंधू-भगिनींना नेहमी जे.पी.शिफारस पत्रासाठी (सहीकरतां) भेडसावणारा प्रश्न सोडविण्याकरितां सर्व परिचय व समाजाच्या संपर्कात असलेल्या एखादया व्यक्तीस जे.पी. साठी प्रयत्न चालू आहेत.

श्री संताजी उत्साही महिला मंडळ, मुंबई (स्थापना दि.४-२-१९६८)

समाज कार्याचा रथ समतोलपणें पुढे नेण्यासाठीमहिला मंडळाची अत्यंत निकड होती. कै. कै.ऋक्मांगद राणोजी काळे तसेंच अनेक जुन्या नव्या कार्यकर्त्यांची समाजात महिला मंडळ असावे याबद्दल अत्यंत तळमळ होती या तळमळीतून काही भागीनी पुढे आल्यामुळे ‘श्री संताजी उत्साही मंडळ,मुंबई’ व ‘तेली सेवा समाज मुंबई’ यांच्या सहकार्याने दि.४-२-१९६८ ‘श्री संताजी उत्साही महिला मंडळ,मुंबई’स्थापन झाले.या उदयोन्मुख महिला मंडळा मार्फत समाजात हळदी कुंकू सारखे कार्यक्रम प्रतिवर्षी केले जातात.महिला वर्गा कडून या कार्यास चांगला प्रतिसाद मिळून प्रगती पथात आहे.



नागपूर,पुणे,नगर आदि महाराष्ट्रातून आपला समाज इतर मागासलेल्या जातीत शासनाकडून समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न झाले त्यानुसार समाजातील आमदार मंडळींना व मुंबईतील सर्व संस्थाच्या प्रत्तीनिधीना बोलावून दि.२०-३-१९६८ रोजी सभा घेण्यात आली. या सभेचे निवेदन मुख्यमंत्र्यांना समक्ष देण्यात आले.महाराष्ट्रातून संघटीत प्रयत्नामुळे आपल्या जातीचे नाव शासनाने इतर मागासलेल्या जातीच्या यादीत समाविष्ट केले,ज्या ज्या सवलती मिळतात त्याची नोंद कार्यालाय ठेवली जाते.याचा फायदा तरुणांना नोकरी,विश्वविद्यालयात प्रवेश,सरकारी पडीत जमिनी मिळविण्याकरिता होत आहे.संस्थेमार्फत छापील दाखला (सर्टिफिकेट) देण्याची व्यवस्था केलेली आहे.आतां पर्यंत ३०० विद्यार्थी विद्यार्थिनींना याचा लाभ घेतलेला आहे.

मुंबईतील सर्व संस्थांचे प्रतिनिधी एकत्र करून ‘तेली समाज आयोजित सत्कार समिती-मुंबई’ स्थापन करून त्याव्दारे दि.९-६-१९६८ रोजी दामोदर हॉल परेल येथे शेतकी मंत्री श्री.बाळासाहेब सावंत व समाजातील आमदार मंडळी यांचा सत्कार समारंभ श्री.रामशेट कि.धोटे,एम.ए.,जे.पी. यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्याचा सर्व पुढाकार तेली सेवा सेवा समजणेच घेतला होता हे आपल्या स्मरणात असेलच.

समाजातील आमदार मंडळी व संस्थेचे कार्यकर्ते.दि.२०/३/१९६८


बसलेले डावीकडून: मा. आमदार रामचंद्र मारोतराव घंगारे, आमदार मा.सुरेश देवतळे, मा. आमदार भाऊसाहेब शेंडे, मा. आमदार ह.स.बारमुख, शेंडे, रा.वि.वाडेकर, डॉ. प.वा. पडोळे, स.ना.रसाळ, मा. आमदार श्री. यादवराव देवगडे, मा. आमदार रामजीवन चौधरी

मुंबईत आपल्या ज्ञातीस साजेशी वास्तु असावी असे प्रत्येकास वाटते.त्याप्रमाणे बरेच प्रयत्न गेल्या आठ दहा वर्षात झाले;पण हे कार्य अजून पूर्णत्वास जाऊ शकले नाही.याची खंत प्रत्येक कार्यकर्त्यास वाटते. या सुप्त भावनेस प्रज्वलित करण्यासाठी विविध संस्थांच्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून श्री.के.सु.चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली एक –दोन सभा आयोजित केल्या होत्या,त्या साभांतून समाजास पोषक असे काही च निष्पन्न होऊ न शकल्याने श्री.के सु.चौधरी यांनी जनमनाचा कानोसा घेऊन ‘तेली सेवा समजा’ सारख्या वर्धिष्णु व ज्या संस्थेजवळ मिशनरी वृत्तीने सातत्याने कार्य करणारे कार्यकर्ते आहेत तसेच पतपेढी सारखे विश्वासाने चाललेले कार्य आज आहे.अशा संस्थेस सर्वांनी सहकार्य करण्याचे आव्हान केले.मुंबईत वास्तू उभारण्यासाठी भरीव निधी असल्याशिवाय काहीच करता येणे शक्य नाही.त्या सभेत चार वर्षाच्या कालावधीत ५ लाखांचा इमारत निधी टप्प्या-टप्प्याने पुरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी योजना आखाव्यात.याप्रमाणे संस्थेच्या जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन इमारत बांधणी विषयावर सर्व दृष्टीने चर्चा करून सर्वानुमते योजना आखण्यात आल्या.


श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढीच्या सौजन्याने दर महा आर्थिक सहाय्यांत भर पाडत आहे.अशा तऱ्हेनें चहूकडून निधी आल्यावर हे कठीण कार्य सोपे व सहजगत्या साध्य होईल असा दृढ आत्मविश्वास वाटतो. समाजातील पुढारी मंडळीना नम्र कळकळीची विनंती आहे की त्यांनी समाज पोषकवृत्ती धारण करून या संकल्पास हातभार लावावा.केल्याने होत आहे रे आधिच केले पाहिजे या उक्तीप्रमाणे –श्री संताजीचे कृपा प्रसादे- हे कार्य होणारच.कारण माताभगिनी देखील उत्साहाने कामास लागल्या आहेत

नागपूरकरांची भेट

श्री.रामशेट कि.धोटे यांच्या मुलीच्या लग्नासाठी नागपूरकर मंडळी आली होती त्यांना दि.१८-१२-१९६९ रोजी श्री.केशव सु.चौधरी यांनी तेली सेवा समजाच्या कार्यालयात खालील मंडळींना आणले होते.श्री.केशव सु.चौधरी यांनी तेली सेवा समाजाच्या कार्यालयात खालील मंडळींना आणले होते.श्री.माधवराव पाटील,सौ.सुलोचना पाटील,श्री.विठ्ठल गो.प्रकाशे,श्री.रामचंद्र टो.येनुरकर,श्री.मारोतराव ग.देवगडे,श्री.नारायणराव न.धुमडे,श्री.जिवाजीराव वि.मोटघरे,श्री.आर.जी.येळणे आदि मंडळींच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता.त्या मेळाव्यांत नागपुरांत व विदर्भात समाज कसा संघटीत व उदयोग धंद्यात संपन्न होत आहे.त्याचे चित्र कार्यकर्त्यांसमोर उभे केले.तसेच राजकीय दृष्टा प्रगती पथावर येत आहे व त्यांचे कसकसे प्रयत्न चालले आहेत त्याचे अनुभव कथन केले.श्री.माधवराव पाटील यांनी सबंध महाराष्ट्रातील व भारतातील तेली संघटीत झाला पाहिजे व आपले प्रश्न राज्यकर्त्यांकडून सोडवून घेतली पाहिजेत यांचे मार्मिकतेने विचार मांडले.त्याचं वेळी दि.१८-१-१९७० रोजी धुळे येथील अधिवेशनास येण्याचे सर्वांना आमंत्रण दिले.


धुळे येथील आदिवेशनास मुंबईहून तेली सेवा समजाच्या वतीने श्री.ना.वि.कांदळगावकर,श्री.रघुनाथ गोविंद राणे तसेच प्रांतिक युवक मंडळाचे अध्यक्ष श्री.माधवराव भि.मेहेरे आदि गेले होते.त्या अधिवेशनात श्री. ना. वि. कांदळगावकर यांनी मुंबईतील कार्याचा परिचय करून दिला.महाराष्ट्र प्रांतिक तैलिक सभेच्या बैठकीस माननीय श्री.दीनबंधू साहू,श्री.माधवराव पाटील व मान्यवर महाराष्ट्राचे पुढारी उपस्थित होते.ठिक ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळे ठराव मांडले.मुंबईच्या दृष्टीने श्री. ना.वि.कांदळगावकर यांनी ‘मुंबईत समाजास साजेसे सभागृह नाही,त्यासाठी सर्व परीने दूर विचार करून तेली सेवा समाज-मुंबई या संस्थेने ५ लाख इमारत निधी उभारण्याचा संकल्प केला आहे.यास महाराष्ट्रातून व भारतातून अर्थी सहाय्य करावे.असा ठराव मांडला व तो सर्वानुमते पास झाला.त्याचं सभेत गुढी पाडवा या शुभ दिनी (दि.७/४/१९७०) ५ लाख इमारत निधीची जाहीर घोषणा करण्यासाठी मुंबईतील कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले.तसेच दिनांक १-३-१९७० रोजी श्री.माधवराव पाटील यांनी मुंबईस येण्याचे ठरविले.


वरील चित्र मा.रघुनाथ दाभोळकर यांच्या कुंचल्यातून निर्माण झाले आहे व श्री संताची उत्साही मंडळाच्या सौजन्याने लाभले आहे.

तेली सेवा समाजाच्या कार्य्कार्त्यांच्या प्रयत्नाने व ‘महाराष्ट्र प्रांतिक तैलिक सभा-नागपूर’यांच्या प्रेरणेने मुंबईत ‘मुंबई जिल्हा तैलिक सभे’ ची स्थापना दि.१-३-१९७०रोजी झाली. दि.३-३-१९७० रोजी कार्यकारणीची निवड श्री.माधवराव पाटील यांच्या अध्यक्षतेखालीझाली.त्या सभेत श्री.संभाजीराव रायपुरे, श्री.विठ्ठल गो.प्रकाशे व आमदार श्री.ह.स.हटवार तसेच मुंबईतील नामवंत पुढारी यांना मुंबईतील इमारत निधी उभारण्याची योजना व संकल्पित इमारतीचे चित्र दाखवण्यात आले व या योजनेस सर्वांनी संमती दिली.

आपल्या समाजाचे विराट दर्शन दिनांक ७ एप्रिल १९७० या गुढी पाडव्याच्या शुभदिनी स्नेहसंमेलन आपले श्रेष्ठ नेते श्री.दीनबंधू जी साहू एम.ए.एलएल.बी.कटक,माजी मंत्री व अॅड.जनरल (ओरिसा) अध्यक्ष अखिल भारतीय तैलिक महासभा यांचे अध्यक्षतेखाली साजरे झाले.या संमेलनात महाराष्ट्र प्रां.तै. सभेचे अध्यक्ष –श्री.माधवरावजी पाटील,मुख्य सचिव श्री. संभाजीराव रायपुरे;अ.भा.तै.मं.चे संघटक मंत्री श्री.वि.गो.प्रकाशे; मुंबई जि.तै.स.चे अध्यक्ष श्री.के.सु.चौधरी;सर्वश्री आ.दा.जामसंडेकर ,माधवराव मेहेर,पी.एस.बनारसे, आत्माराम जिरापुरे पन्नालालजी गुप्ता;आमदार सर्वश्री.भाऊसाहेब व शेंडे वर्धा,ह.स.हटवार-भंडारा,रामभाऊ पाटील-दिग्रस,डॉ.आर.बी.चौधरी-धुळे;इत्यादि मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.तेली सेवा समाजाच्या कार्यालय समोरील मंडप बंधू भगिनींनी फुलून गेला होता.श्री.प्रकाश गुरुजी व श्री दीनबंधू साहू यांच्या स्फूर्तीदायक भाषणाने उपस्थित समाज मंत्रमुग्ध झाला.श्री.माधवरावांच्या ओजस्वी वाणीने समाज संघटनेचे दिव्य स्वरूप दिसत होते.सौ.वंदना सखाराम बंदरकर यांनी आवेश युक्त वाणीने मुंबईत समाजाची वास्तु उभारण्यासाठी व समाजऋण फेडण्यासाठी जो ५ लाख इमारत निधी उभारण्याचा संकल्प तेली सेवा समाजाने केला आहे त्यास सढळ हाताने देणग्या देण्याचे आव्हान केले व आला वाटा प्रथम दिला.श्री.माधवरावांची परत आलेल्या अमृतमय वाणीने आव्हान केले त्यावेळी स्वयंस्फूर्तीने बंधू भगिनींनी रोख देणग्या व आश्वासने दिली. या अविस्मरणीय संमेलनाने मुंबईतील समाज पुरुष जागृत होत आहे हेच या कार्यक्रमाने साधले आहे.


गेल्या शैक्षणिक वर्षापासून समाजातील होतकरू विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी शालेय पुस्तके परत फेडीने देण्यास सुरवात केली आहे,त्याचा लाभ गरजू विद्यार्जनानी जरूर घ्यावा.कार्यालयात दूरध्वनीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न चालला आहे.

संस्थेच्या कार्यक्रमात वधू-वर सूचक व विवाह मंडळ सुरु करण्याचा प्रयत्न चालू आहे.या उपक्रमास सामाजाकडून चांगला प्रतिसाद मिळेल व लग्न समस्या सोडविणे सोपे जाईल अशी अशा वाटते.


मा.माधवराव पाटील समाजाचे प्रतिक लवकर उभे होण्यासाठी ५ लाखाचा संकल्प पुरा करण्याचे आव्हान करत आहेत.

विभागीय कार्यकर्त्यांची ओळख







समाजातील आमदार कार्यकर्त्यांचा मेळावा

सामाजिक व सांस्कृतिक कार्य:- ३१ मार्च १९७२ रोजी समाजातील आमदार सौ.केशर बाई क्षिरसागर (बीड);सौ.मनोरमा बाई धोटे (गोंदिया) श्री.आ.ला.वाघमारे,श्री.ह.स.हटवारश्री राम जीवन चौधरी तसेच रत्नागिरी जिल्हातील आमदार श्री.केशवराव राणे आदि आमदारांचा समाजाच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला.सौ.केशरबाई क्षिरसागर यांनी संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून समाजाच्या इमारत निधीच्या प्रकल्पास रु.२०१/- देऊन हातभार लावला व समाजाच्या वस्तूसाठी मुंबईत जागा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे असे प्रतिपादन केले सौ.मनोरमा बाई धोटे यांनीही इमारत निधीसाठी रु.२५१/-देणगी देऊन इमारतीसाठी विदर्भ विभागातून निधी गोळा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.त्याच प्रमाणे आमदार सर्व श्री.आ.ल.वाघमारे,केशवराव राणे यांनीही इमारतीसाठी जागा मिळवून देण्याच्या प्रयत्नास हातभार लावण्याचे आश्वासन दिले.उपस्थित आमदारांना श्री.आत्माराम दाजी जामसंडेकर यांच्या हस्ते पुष्पहार देवून यथोचित सत्कार करण्यात आला.


डावीकडून :- मा.बाबाजी जामसंडेकर, मा.आमदार वाघमारे, मा. आत्माराम जामसंडेकर, मा. माधवराव पाटील, मा. विठ्ठल खानविलकर, मा. प्रकाश गुरुजी, मा.श्रीम.पाटील, मा.श्रीम.मणचेकर

स्नेह संमेलन

दि.७ एप्रिल १९७० रोजी (गुढी पाडव्याच्या दिवशी) झालेले संमेलन आपल्या स्मरणात असेलच त्याचं स्वरूपाचे स्नेह संमेलन दि.१ मे १९७२ रोजी अखिल भारतीय तैलिक वैश्य महासभेचे उपाध्यक्ष श्री.माधवराव पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडले.सौ.सुलोचना माधवराव पाटील,श्री.शरद दिघे आदि नामवंत मंडळी उपस्थित होती वरील उपस्थितांनी समाजाच्या विविध स्तरावरील समस्या सोडविण्याचे मार्गदर्शन केले.श्री.प्रकाश गुरुजी यांनी आपल्या समाजाच्या स्फूर्तीदायक इतिहास मधुर वाणीने कथन केला.आपल्यातला न्यूनगंड पर काढून टाकण्याचे आव्हान केले.श्री.माधव राव पाटील यांनी आपल्या ओजस्वी वाणीने अखिल समाज संघटनेचे दिव्य चित्र समोर ठेविले.सौ.सुलोचना पाटील यांनी महिलांची संघटन संघटना बांधून महिलांची चूल-मुल सांभाळून सामाजिक कार्यात रस घेण्याचे महिलांना आव्हान केले.सौ.अवंतिका बाई बा.रसाळ यांनी महिला मंडळाच्या कार्याची महती सांगितली.तेली सेवा समाजाच्या कार्यालयासमोरील मंडप बंधू भगिनीच्या उपस्थिती ने भरगच्च फुलाला होता.या अविस्मरणीय संमेलनाने मुंबईतील समाज पुरुष जागृत होत आहे हेच या याक्रमाने साधले आहे.

परगांवावरून आलेल्या पाहुण्यांची व कार्यकर्त्यांची भोजनाची व्यवस्था सौ.मिनाक्षी अर्जुन मटकर आणि इतर कार्यकर्त्यांनी केली होती.

युवक मेळावा

समाजातील युवाशक्ति जागृत करण्यासाठी दि.१५-७-१९७३ रोजी कार्यालयात युवक मेळावा घेण्यात आला होता.या मेळाव्यास १२५ युवक युवती उपस्थित होते.युवकांनी प्रामुख्याने आपल्या शैशैक्षणिक अडचणी मांडल्या.आपला समाज अजून शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे.तो लवकरात लवकर प्रगती पथावर आणण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा असा आग्रह धरला.

कु . शरद बापू नांदगांवकर पुढील शिक्षणासाठी अमेरीकेत जाताना

कुमार शरद नारायण नांदगावकरयांनी आय.आय.टी. पवई येथील १९७५ च्या बी.टेक.या पदवी परीक्षेमध्ये सर्व विषयात प्रथम क्रमांक मिळवून आय.आय.टी.चे राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळविल्या बद्दल !

डॉ.प्रल्हाद रामचंद्र डिचवलकर यांनी अॅप्लाईड बायोलॉजी या विषयात पीएचडी हि पदवी संपादन केल्या बद्दल त्यांचा दिनांक ३१ ऑगस्ट१९७५ रोजी श्री.रमेश खोडे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला कुमार शरद नांदगावकर हे आता अमेरिकेत बर्कले येथे कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये एलेक्ट्रिकल इंजिनिअरींग व कॉम्पुटर सायन्स या विषयातील एम.एस.या पदवीचा तसेच पीएचडी चाही अभ्यास करत आहेत.


डावीकडून:- श्री.धोंडू तेली,सौ.भागीराठीबाई तेली, कु.मंगेश तेली, श्री.हिरानाथ देशमाने, डॉ.धोटे, श्री.बापू नांदगावकर, श्री.नामदेव कांदळगावकर

कु.मंगेश धोंडू तेली यांनी मुंबई विद्यापीठाच्या टेक्स टाईल केमिस्ट्री या विषयातील बी.एस सी (टेक) परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून चार पारितोषिके मिळविल्या बद्दल त्यांचा दिनांक त्यांचा दि.१५ ऑगस्ट १९७६ रोजी श्री.हिरानाथ जगन्नाथ देशमाने,यांचे अध्यक्षतेखाली हृद्य सत्कार करण्यात आला.श्री.मंगेश एकनाथ तेली हे आता एम.एससी.(टेक) चा अभ्यास करत आहोत.

आपल्या समाजातील थोर उद्योगपती डॉ.रा.कि.धोटे यांच्या अलटां भवनात दि.२६/१०/१९७५ रोजी विविध उद्योगातील,शासकीय व सामाजिक कार्यकर्ते यांचा मेळावा झाला.

विविधं उद्योगांतील व शासकीय अधिकारी यांचा अल्टा भवनात झालेला मेळावा

शैक्षणिक मदत:

गेल्या सहा वर्षाच्या कालावधी मध्ये आपल्या संस्थेतर्फे विद्यार्थांना क्रमिक पुस्तके देण्यात आली.त्याचं प्रमाणे इमामवाडा विभागातील आपल्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अविरत प्रयत्न करून व खास निधी गोळा करून तेथील विद्यार्थ्याना सन १९७२ मध्ये गरजू विध्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके व वह्या दिल्या १९७६-७७ या वर्षातही शैक्षणिक मदत करण्यात आली.

श्रीमती सुशिला रसाळ यांचा सत्कार


महिला कार्यकर्त्या

संत संताजी महाराज जगनाडे चौक:

साने गुरुजी मार्ग आणि बाबासाहेब आंबेडकर मार्ग यांच्या लालबागच्या नाक्यावरील चौकाला ‘संत संताजी जगनाडे चौक’ असे नाव देण्याचा समारंभ गुरुवार दि.१४/४/१९७७ रोजी सकाळी ९ वाजता श्री.वामनराव शि.महाडिक माजी अध्यक्ष स्थायी समिती यांच्या शुभहस्ते नामकरण पार पडले. त्यानंतर न्यु हनुमान थियेटर लालबाग येथे श्री.नागेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.प्रमुख पाहुणे श्री.अनंतराव पाष्टे अध्यक्ष स्थापल्यसमिती (शहर) नगर सेवक श्री.रुस्तम तिरंदाज,माजी नगर सेवक श्री.भाई शिंगरे, श्री.सुरेंद्रर.बारमुख, श्री.सहदेव पिंगळे, श्री.ना.वि.कांदळगावकर, श्री.दत्ताराम ना.ठावरे श्री.गोपाळ गं.झगडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

वरील सर्व घडविण्यासाठी बृह्मुंबई तिळवण तेली समाज या संस्थेने व लालबाग येथील कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतली या सर्वांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो.

सभागृहाच्या पुनर्बांधणीचे काम

समाजाने १९५९ साली आपल्या अमोल सहकार्याने शंकरराव नरम पथ,लोअर परेल, मुंबई ४०००१३.येथे छोटे सभागृहाच्या पुनर्बांधणीचे काम सन १९७८ मध्ये हाती घेतले व मार्च १९७९ मध्ये पूर्ण झाले.श्री.सदाशिव पवार पुणे यांनी पुनर्बांधणीचे काम केले.या कार्यालयाचे गुढीपाडव्याच्या शुभदिनी बुधवार दि. २८/३/१९७९ रोजी श्री.आत्माराम तथा भाई डिचोलकर यांच्या शुभहस्ते वास्तुशांती व श्री सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. तेली सेवा समाज कार्यान्वीत श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी व वधूवर सूचक मंडळ यांचे कामकाज या शुभदिना पासून या कार्यालयात चालू झाले.


सौ.व श्री. आत्माराम शंकर डिचोलकर होम हवन करताना.


मा.शिक्षण मंत्री श्री.सुरेश देवतळे यांना श्रीफळ व पुष्प गुच्छ अर्पण करीत आहेत.डॉ. लक्ष्मी कांत मि. परिहार, मागे आमदार श्री. सुभाष कारेमोरे, श्री.कांदळगावकर व कार्यकर्ते.

दि.२० जुलै १९८० रोजी महाराष्ट्राचे राज्य शिक्षण व ग्राम विकास मंत्री माननीय सुरेश बाबू देवतळे व आमदार श्री.सुभाष कारेमोरे श्री.प्रमोद शेंडे मधुकर किंमतकर,आर.आर.काटेखाय श्री.पोटदुखे(एम.पी.) श्रीमती.क्षिरसागर(एम.पी.) यांचा सत्कार समाजातर्फे श्री.माधव राव पाटील माजी आमदार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.श्री.ना.वि.कांदळगांवकर यांनी उपस्थित आमदार व मंत्री यांचा परिचय करून दिला.यानंतर कार्यकर्त्यासह सर्वाचे सह भोजन झाले.स्थानिक महिलांनी भोजनाची व्यवस्था केली होती.

समाजाची शिरगणती :

तेली सेवा समाज मुंबई हि संस्था अनेक वर्षे लोकोपयोगी कार्य करीत आहे.या मुंबई नगरीत आपल्या समाजातील अनेक कुटुंबे मुंबईच्या कान्याकोपऱ्यात विखुरलेली आहेत.त्यांचा प्रत्यक्षात कोणालाच अंदाज लागणे कठीण आहे.समाजाची अजून पर्यंत पूर्णपणे शीर गणती कधीच झाली नाही.मुंबईत राहणरी हिंदू तेली कुटुंबे ती कुठल्याही प्रदेशाची असोत, त्यांची शिरगणती करण्याची योजना संस्थेने आखली आहे. या योजनेचे उद्धाटन शुक्रवार दि.१५ ऑगस्ट १९८०रोजी तेली सेवा समाजाच्या कार्यालयात श्री.दत्ताराम विठोबा पेटकर यांचे हस्ते झाले व या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी श्री.केशव शंभू रसाळ हे होते.ते प्रमुख वक्ते म्हणून श्री.जी.एन.चौधरी संपादक श्री संताजी प्रसाद व डॉ.श्री.ल.मि.परिहर होते.


श्री.गो.ना.चौधरी - संपादक श्री संताजी प्रसाद

शिरगणतीचे काम कार्यकर्त्यांनी चालू ठेवले आहे अद्यापी काम पूर्ण झालेले नाही तरी या उपक्रमास मुंबईतील सर्व संस्थांनी व समाज बांधवांनी सहकार्य करावे ही विनंती आपल्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्यास नमुन्याप्रमाणे आपल्या कुटुंबाची संपूर्ण माहिती दया.आपल्या कडून सढळ हस्ते आर्थिक सहाय्य करावे हि विनंती आपल्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्यास नमुन्या प्रमाणे आपल्या कुटुंबाची संपूर्ण माहिती दया.आपल्या कडून सढळ हस्ते आर्थिक सहाय्य देऊन संस्थेचे सभासद व देणगीदार व्हा.प्रसिद्ध झालेली प्रत आपणास पाठवली जाईल.आपल्या ओळखीने जाहिरातीही दिल्यास आम्ही उपकृत होऊ.हे काम अतिशय वेगाने होणे आवश्यक आहे त्यासाठी समाज बांधवांनी पुढे येऊन काही जबाबदारी स्विकारावी.विद्यार्थांनी आपला अभ्यास सांभाळून आपल्या वस्तीत हे काम करावे.हे त्यांना आवाहन आहे.वेळोवेळी कार्यालयात संपर्क साधावा.

समाजाच्या वतीने एस.एस.सी.हायर सेंकडरी व उच्च महाविद्यालयीन यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार १५ ऑगस्ट १९८१ रोजी “मित्र धाम सभागृह” परेल,मुंबई ४०००१२ येथे श्री. मनोहर शेठ गोविंदराव धोटे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.श्री हरी,श्री.हिरानाथ जगन्नाथ देशमाने होते.या कार्यक्रमासाठी ज्यांची नावे गुण पत्रीकेसह आली त्यांनाच पारितोषिके देण्यात आली.कार्यक्रमाची माहिती वर्तमान पत्रात देण्यात आली होती.

वधू वर सूचक मंडळ - दि.२४ मार्च १९७४

समाजातील विवाहेच्छू वधू वरांना अनुरूप वधू वर शोधून पाल्यांना लग्न समस्या सोडविण्या बाबत मदत करण्याच्या हेतूने वधू वर सूचक मंडळाचे उद्घाटन श्री.नारायण (बापू ) नांदगावकर यांच्या अध्यक्षतेखाली गुढी पाडव्याच्या शुभ दिनी दि.२४ मार्च १९७४ रोजी करण्यात आले.या मंडळाला आपल्या समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे हे नमुद करण्यास आम्हाला आनंद वाटतो.मंडळाच्या उज्वल कार्याबद्दल पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन.

समाजातील विवाहेच्छू वधू-वरांना अनुरूप वधू-वर शोधून पालकांना लग्न समस्या सोडविण्याबाबत मदत करण्याच्या हेतूने दि.२४ मार्च १९७४ पासून मंडळाचे काम आस्थापूर्वक चालू आहे.गेली तीन वर्षे मंडळाचे अध्यक्ष श्री.यशवंत सखाराम नरवणकर आहेत.मंडळाकडे अशा विवाहेच्छूक मुलींची ११२ व मुलांची ८७ नावे सध्या पटावर आहेत.पैकी काही मुले-मुली पदवीधर आहेत. शक्यतो मुलामुलींच्या अपेक्षेनुसार अनुरूप स्थळे मिळण्यास त्यामुळे मदत होत आहे.शक्यतो मुलामुलींच्या जन्म पत्रिकेवरून गुणमिलन झालेली स्थळे सुचविली जातात. त्यामुळे विवाह जुळण्यास पालकांना त्रास घ्यावा लागत नाही. समाज बांधवांच्या सूचनेप्रमाणे वधू वरांचे दोन मिळावे या वर्षात संस्थेच्या जागेत भरविण्यात आले.अशा मेळाव्यातून परस्पर ओळखीचा कार्यक्रम आयोजित केल्याने विवाह जुळविण्यास बरीच मदत होत आहे.सामुदायिक विवाह आयोजिण्याची कार्यकर्त्यांची योजना आहे. पालक व विवाह कमी खर्चात करून देतील असा विश्वास वाटतो.

मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते दर बुधवारी संध्याकाळी ६ ते रात्रौ ८.३० पर्यंत समाजाच्या कार्यालयात हजार राहून समाज बांधवांना पटावरील उपयुक्त त्या स्थळांचे मार्गदर्शन करतात व नवीन स्थळांची नोंद अर्जावर संपूर्ण माहितीसह घेत असतात.जरूर तेव्हा दर सोमवारी दोन्ही पक्षांकडील पालकांना प्रत्यक्ष ओळख करून देऊन विवाह जुलाविण्याच्या दृष्टीने मदत करीत आहोत.तेव्हा समाज बांधवांनी या योजनेचा फायदा अवश्य घ्यावा व ज्या बांधवांकडे अशा विवाहेच्छुक स्थळांची माहिती असेल त्यांनी ती संपूर्ण माहितीसह मंडळाकडे दिल्यास त्याचा उपयोग समाज बांधवांना दिला जाईल व दिवसेंदिवस कठीण होत असलेली ही विवाह समस्या सोडविण्यास प्रत्यक्ष हातभार लावल्याचे श्रेय घेता येईल.



अभिनंदन

संस्थेचे दैनंदिन कार्य नेटाने चालले आहे.त्यासाठी अनेक कार्यकर्ते झटत आहेत.

श्री सदाशिवराव पवार (कॉनट्राक्त्रर) पुणे यांनी कार्यालय पूर्ण बांधणीचे काम करून दिले त्या बद्दल संस्था त्यांची ऋणी आहे. गं.भा.रुक्मिणीबाई भगवान कांदळगावकर,श्री.केशव शंभू रसाळ,श्री.गणेश प्रसाद साहू,श्री.विनायक पुंडलिक तळवडेकर बंधू यांनी संस्थेस आर्थिक सहकार्य केले त्याबद्दल संस्था त्यांची ऋणी आहे.

श्री.रामचंद्र वाडेकर व श्री.केशव होळकर यांनी वेळोवेळी समाजाच्या कार्यक्रमाच्या वेळी आमंत्रण पत्रिका विनामूल्य छापून दिल्या त्याबद्दल संस्था त्यांची ऋणी आहे.

श्री.नामदेव व श्री.एकनाथ विठ्ठल कांदळगावकर बंधू यांनी कै.विठ्ठल रामजी व कै.भागीरथी बाई विठ्ठल व कै.मंगेश केशव कांदळगावकर यांच्या स्मरणार्थ रुपये १,१०५/- संस्थेला शैक्षणिक निधी दिला. श्री. कांदळगावकर बंधूच्या इच्छेनुसार प्रतिवर्षी विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जातील.

श्री. आत्माराम तथा भाई डिचोलकर, श्री.नामदेव कांदळगावकर, श्री.चंद्रकांत साटविलकर, श्री.नारायण आयकर, श्री.निवृत्ती घोंगते, श्री.सिताराम कुर्ले, श्री.विनायक रहाटे, श्री.सोमाजी साखरकर, श्री.श्रीधर महाडिक, श्री.रघुनाथ महाडिक, श्री.सुधाकर वालावलकर,श्री.गोपाल झगडे, श्री.डी.जी.भक्त, श्री.शांताराम घाणेकर, कु.अरुणा दत्ताराम किंजवडेकर, श्री.चंद्रकांत शेलार, श्री.मोहन पाटकर, श्री.गोपाल तेली, श्री.शरदचंद्र पवार, श्री.वासुदेव चाफेकर, श्री.बाळ कृष्ण राऊत,श्री.गणेश डिचोलकर, श्री.शांताराम आंब्रे, श्री.मनोहर राणे.या कार्यकर्त्यांनी आपला अमोल वेळ खर्च करून शिरगणती च्या कामात अमोल सहकार्य केले.

मित्र धाम सभागृह परेल,मुंबई ४०००१२ च्या संचालक मंडळाने संस्थेस अल्प भाड्यात सभागृह संस्थेच्या विविध कार्यक्रमाला दिले.त्याबद्दल संस्था आभारी आहे.

कार्यालय पुनर्बांधणी च्या कामावर श्री.सदाशिव ना.दाभोळकर श्री.भाई डिचोलकर श्री.अण्णा महाडिक-वसई,श्री.नामदेव कांदळ गावकर,श्री.दत्ताराम राणे यांनी आपला अमोल वेळ खर्च करून कार्यालय पुनर्बांधणीचे काम पूर्ण करून घेतले.

श्री.गंगाराम दाभोळकर यांनी वायरिंग फिटींगचे काम करून दिले.स्थानिक महिलांनी मंत्री व आमदार तसेंच कार्यकर्ते यांच्या भोजनाची व्यवस्था केली त्यांचे अभिनंदन श्री.दत्ताराम लक्ष्मण किर्वे यांनी संस्थेचा हिशेब आपला अमूल्य वेळ खर्च करून तपासून दिला.

श्री.बबन रत्नपारखी यांची मॅजिस्ट्रेट पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.श्री.अर्जुनशेठ मारुती शेठ तेली- दहितुले, बरड ता.फलटण यांचा षष्ठाब्दी समारंभ दि.१६/१२/१९८१ रोजी थाटात साजरा झाला.त्यांना आमच्या शुभेच्छा व अभिनंदन.

श्री.विजय करंदिकर चार्टर्ड अकाउटंट यांनी संस्थेचा हिशोब तपासून दिला त्याबद्दल संस्था आभारी आहे.

मुख्यमंत्र्यांचा संदेश

तेली सेवा समाज या आपल्या संस्थेने समाजातील सर्व बंधू-भगिनीच्या अमोल सहकार्याने गेली तेहत्तीस वर्षे काम करून ३४ साव्या वर्षात पदार्पण केले आहे.

सन १९८२ ते १९८५ या कालावधीचा अहवाल व जमाखर्च आपणापुढे सादर करण्यात आनंद वाटत आहे.

प्रत्येक समाजाने सामाजिक उन्नतीसाठी संघटनात्मक प्रयत्न करून राष्ट्राच्या जडण घडणी मध्ये आपलाल्या परीने हातभार लावला आहे.त व्दत आपल्या समाजाने परस्पर सहकार्याने संघटना व बंधू-भाव निर्माण करून समाजाची सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात प्रगती करण्याचा संस्थेचा दृष्टीकोन आहे.या सर्व गोष्टींना चालना मिळण्यासाठी मुंबईत समाजाच्या मालकीची वास्तू असावी यासाठी संस्थेचे अविरत प्रयत्न चालू आहेत.

आपल्या समाजाला शासनाच्या मागासवर्गीय सवलती मिळविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश तेली युवक संघटनेचे अध्यक्ष श्री.पांडुरंग पिसे नागपूर यांनी मुंबईत दि.२३-३-१८८२ पासून प्राणांतिक उपोषण केले होते.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.बाबासाहेब भोसले यांनी याबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन दि.३०-२-१९८२ रोजी दिले.त्यानंतर नामदार श्री.शिवाजी राव मोघे यांच्या हस्ते लिंबाचा रस देऊन प्राणांतिक उपोषणाची समाप्ती झाली.समाजातील सर्व आमदारांना श्री.सुभाष कारेमोर व खासदार सौ.केशर बाई क्षिरसागर यांनी एकत्र आणून हे नाट्य घडविले.

प्राणांतिक उपोषण :-

श्री.पांडुरंग पिसे यांचा सत्कार संस्थेच्या वतीने रविवार दि.१८-४-१९८२ रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता अॅड.नारायण पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून नामदार श्री.शरद राव दिघे,सभापती विधान सभा,नामदार श्री.शिवाजी राव दिघे,राज्य मंत्री-समाज कल्याण यांनी मार्ग दर्शन केले.

गरिबांची सेवा हेच आपले ध्येय समजणारे व समाजवादाचे कट्टर पुरस्कर्ते नगर सेवक श्री.बी.झुटे व आमदार सौ.शरयू ठाकूर या दोन समाज सेवकांची महाराष्ट्र सरकारच्या गृहनिर्माण व क्षेत्राविकास मंडळाच्या प्रमुख पदी निवड झाल्या बद्दल संस्थे तर्फे त्यांचा श्री.नामदेव कांदळ गावकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला.प्रमुख पाहुणे श्री.मधुकांत शुक्ला अध्यक्ष युवक कॉंग्रेस मुंबई श्री.के.वाय.पावसकर माजी नगरसेवक यांनी मार्गदर्शन केले.

संस्थेच्या वतीने समाजातील एस.एस.सी. हायर सेकंडरी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनिंचा सत्कार सभारंभ श्री.चिमाजी शंकर पावसकर यांचे अध्यक्षतेखाली शनिवार दि.६/११/१९८२ रोजी स्थळ मित्राधाम सभागृह,परेल मुंबई ४०००१२ येथे पार पडला. प्रमुख पाहुणे आमदार सौ. शरयू ठाकूर, श्री. श्रीकांत आंब्रे, सह-संपादक मुंबई सकाळ श्री.गो.ना.चौधरी संपादक श्री संताजी प्रसाद, श्री.हरिभाऊ डिगोरकर - पनवेल हे होते.

यशस्वी विद्यार्थांचा सत्कार समारंभ रविवार दि.२८ ऑगस्ट १९८३ रोजी सायंकाळी ४.३० वाजता स्थळ कित्ते भंडारी हॉल,गोखले रोड,दादर,मुंबई ४०००२८ येथे अॅड.श्री.नारायण पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.प्रमुख पाहुणे-श्री.प्रभाकर मणचेकर आय.ए.एस.व्यक्ते श्री.गजानन भोवर-अध्यक्ष एन.यू.बी.सी.श्री.शशिकांत रसाळ होते.

रविवार दि.११-३-१९८४ रोजी समाजाचे प्रथम शिबीर संस्थेचे अध्यक्ष श्री.नारायण राव आयकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.हे शिबीर सकाळी ९.०० पासून संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत होते.या शिबिरात शैक्षणिक मदतीसाठी भाग्यशाली सोडत व समाज उन्नतीसाठी तरुण आघाडी स्थापन करण्याचे ठरले.

तरुण आघाडी स्थापना :

रविवार दि.२२-४-१९८४ रोजी दुपारी ठीक ३.३० वाजता श्री.नामदेव कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थळ: तेली सेवा समाज-शंकर राव नरम पथ,लोअर परेल,मुंबई ४००१३. (कार्यालयासमोरील भव्य पटांगण) येथे तरुण आघाडी उद्घाटन मेळावा भरविण्यात आला.

प्रमुख व्यक्ते: (१)श्री.प्रभाकर मंचेकर- आय.ए.एस. (२) श्री.स.गो.थोरात- एम.ए.एल.एल.बी. हे होते. या शुभ दिनी तरुण आघाडी स्थापन करण्यात आली.प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी ६ नंतर तरुण मंडळींच्या चर्चात्मक सभा होतात. त्यांचे काम जोमाने चालू आहे. युवा शक्तीच्या मदतीने व्यवसाय मार्गदर्शन, कला विभाग, वैयक्तिक अभिनय स्पर्धा, स्वत दरात वह्या वाटप इत्यादी कार्यक्रम सध्या राबविले जात आहेत. तरुण आघाडीची धुरा प्रथम श्री.विनायक कुवेसकर -अध्यक्ष व श्री.विनायक वेंगुर्लेकर -चिटणीस यांची उत्तम प्रकारे सांभाळली आतां श्री.हेमंत कांदळगावकर - चिटणीस श्री.पुरषोत्तम पावसकर - कार्याध्यक्ष श्री. शंकर सोलगावकर - उपाध्यक्ष श्री. दिनानाथ वालावलकर - कला विभाग प्रमुख क्रियाशील कार्यकर्त्यांच्या मदतीने सांभाळीत आहेत.

व्यवसाय मार्गदर्शन :

दिनांक २२-६-१९८४ रोजी व्यवसाय मार्गदर्शन केंद्राचे व ततसंबंधी त्रिदिवशीय प्रदर्शनाचे उद्घाटन समारंभ विभागीय आमदार श्री.भाऊराव पाटील चेअरमन-आय.टी.आय. व उदयोग विनियम केंद्र यांच्या हस्ते झाले. व्यवसाय मार्गदर्शनाचा बहुसंख्य ज्ञाती बंधू भगिनींनी लाभ घेतला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. शिवाजी झगडे व विनायक कुवेसकर व इतर कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली.

भाग्यशाली सोडत:

शैक्षणिक फंडा करिता भाग्यशाली सोडत दिनांक २३-९-१९८४ रोजी करण्यात आली. ती यशस्वी करण्यासाठी सर्व श्री.अंकुश साळसकर, अशोक रहाटे,दिनानाथ वालावलकर व तरुण आघाडीचे यशस्वी कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेऊन यशस्वी केली.

यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनीचा सत्कार:

एस.एस.सी.हायर से कंड री,महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनीचा सत्कार सभारंभ श्री.स.गो.थोरात एम.ए.एल.एल. बी. यांच्या अध्यक्षेतेखाली रविवार दि.७ ऑक्टोबर १९८४ रोजी सायंकाळी ठीक ४.३० वाजता डॉ.शिरोडकर स्मारक मंदिर हॉल,परेल,मुंबई ४०००१२. येथे यशस्वीरीत्या पार पडला प्रमुख पाहुणे सर्व श्री.अरुण धोटे,केशव रसाळ,डॉ.एस.एम.परिहार,अंकुश साळसकर ,डॉ.पंकज बंदरकर.अॅड.हरिश्चंद्र वालावलकर हे उपस्थित होते.

समाजाचे व्दितीय शिबीर रविवार दि ९-१-१९८५ रोजी सकाळी ठीक ९.०० ते संध्याकाळी ६.०० वाजे पर्यंत संस्थेच्या कार्यालयात समाजाचे अध्यक्ष श्री.नारायण आयकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.या शिबिरात ज्ञातीच्या मान्यवर बांधवांनी भाग घेतला मान्यवर व्यक्तींच्या सुविचाराने संस्थेच्या कार्याला चालना मिळालेली आहे.

या विचारातूनच संस्थेची माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचावी व समाजाच्या कार्यास चालना मिळावी यासाठी संस्थेच्या होणाऱ्या स्नेह संमेलना निमित्त “संताजी स्मृती ८५” स्मृती स्मरणिका अंक काढावा असे ठरले. संताजी स्मृती -८५ व स्नेह संमेलन कार्य कारिणी समिती नेमण्यात आली.सदस्य सर्व श्री.जगन्नाथ जाधव,चंद्रकांत साटविलकर,दिनानाथ वालावलकर,शिवाजी झगडे,अशोक रहाटे,गोपाळ झगडे,गोविंद कामतेकर,हेमंत कांदळ गावकर,अनिल शेलार,सुहास राणे,सुहास नांदोस्कर,दत्ताराम राणे,कु.मीना नांदोस्कर व नामदेव कांदळगांवकर या कार्यकर्त्यांनी सक्रीय भाग घेऊन “संताजी स्मृती ८५ ” स्मर्निकेसाठी खालील समाज बांधवांनी जास्तीत जास्त जाहिराती मिळवून दिल्या.सर्व श्री. चंद्रकांत साटविलकर, शिवाजी झगडे,नारायण आयकर,आर.ए.डीचोलकर,भगवान पाटील,रघुनाथ राणे, दिनानाथ वालावलकर,धोंडू तळावडेकर,जगन्नाथ जाधव,विनायक वेंगुर्लेकर व गोविंद कामतेकर.

समाजाचे स्नेह संमेलन व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवार दि.२७/१०/१९८५ रोजी रविंद्र नाट्य मंदिर-प्रभादेवी येथे कॅप्तन अशोक अंबाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.प्रमुख पाहुणे सौ.जयश्री गडकर (सौ.धुरी ) श्री.मारुती खेडसकर (शिवसेना नगर सेवक) मच्छिंद्र कांबळी हे उपस्थित होते.यशस्वी विद्यार्थांचा सत्कार सौ.जयश्री गडकर यांच्या हस्ते करण्यात आला.’प्रपंच हेच एक ध्येय न ठेवता सामाजिक कार्यात भाग घेतला जावा’ असे आवाहन सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सौ.जयश्री गडकर यांनी तेली सेवा समाज स्नेहसंमेलना प्रसंगी केले.

या प्रसंगी मालवणी विनोद मूर्ती श्री. मच्छिंद्र कांबळी व मारुती खेडसकर यांनी मार्ग दर्शनपर भाषण केले. संताजी स्मृती -८५ स्मरणिकेचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅप्तन अशोक अंबाडेकर यांच्या हस्ते झाले.

तेली सेवा समाज कला विभागातर्फे ‘झोपा आता गुपचूप ’ हे तीन अंकी नाटक सादर करण्यात आले.नाटक यशस्वी करण्यासाठी सर्व श्री.दिनानाथ वालावलकर,सुहास नांदोस्कर,हेमंत कांदळ गावकर,किशोर रहाटे,जगन्नाथ जाधव व इतर यशस्वी कलाकार यांनी विशेष मेहनत घेतली.

कला विभागाचा उगम :

तसा वृक्ष अजून फुलायचा आहे.हे रोपटे आम्ही १९८४ साली लावले आणि त्यास खतपाणी २२ एप्रिल १९८५ रोजी दिले.पालवी फुटू लागली.नवीन कलाकार अभिनेता,अभिनेत्री,गायक,नर्तिका,वादक व अशा सर्वांचा संगम होऊ लागला आणि प्रत्येक कलाकारांनी त्यावेळेस रंग देवतेस आव्हान केले कारण आम्हास खुप मोठे व्हावयाचे आहे.त्या बरोबर आमच्या समाजाला सुद्धा मोठे करायचे आहे.

जिद्द आणि प्रयत्नाच्या जोरावर कार्यक्रमास सुरवात झाली सर्व वैयक्तिक अभिनय स्पर्धा घेऊन कलाकारांची ओळख करून घेतली आणि नंतर चोवीस कलाकारांच्या संचात “चाळ बघा चाळ ” हि स्त्री पुरुष,बालकलाकरांचा समावेश असलेली संगीत एकांकिका आम्ही अनेक ठिकाणी सदर केली व उत्तम प्रतिसादही मिळविला.आमचा आत्मविश्वास बळावला.त्याचं जोरावर संताजी उत्सवाला केलेला नाच गाण्याचा कार्यक्रम तर समाज बांधवांना अतिशय आवडला,आमचा पाय मजबूत झाला अशी आमची खात्री झाली आणि यावरच ‘’करता करता उजवाडला’ मालवणी एकांकीकेची बांधणी झाली.मुंबईत प्रत्येक स्पर्धामध्ये आम्हाला यश मिळाले.एकूण आठ बक्षिसे आम्ही जिंकली,कलाकारांचे कौतुक करावे तितके थोडे माझा असा समाज आहे या यशात समाजातील प्रत्येक घटकांचा समावेश आहे.वरिष्ठ मंडळीने आम्हाला केलेली मदत आणि माझ्या कलाकारांचे सहकार्य हेच या कोड्याचे उत्तर.

समाजातील प्रत्येक कलाकारास माझी कळकळीची विनंती आहे कि आपला स्वतःचा कला विभाग म्हणजे आपला अग्रहक्क,त्या वेळी आपले कलागुण समाजातील असंख्य नवीन कलाकारांना उत्तेजित करण्यासाठी कमी लावावे,व त्यांना आपल्या सुप्त गुणांची जाणीव करून द्यावी.आपल्या कलाविभागाची “झोपा आता गुपचूप” हि कलाकृती आपल्या कलाकारांच्या आणि आपल्या कला विभागांच्या उंचीचा आपणास चांगलीच ओळख झालेली आहे,म्हणून म्हणतो आपल्याला वृक्षाचा वट वृक्ष करायचा आहे हे विसरता कामा नये.

आपला अॅड.दिनानाथ वालावलकर –कला विभाग प्रमुख

विद्यार्थी गुणगौरव सोहळा :

प्रिय ज्ञाती बांधव आणि भगिनी

संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराजांना अभिवादन करून प्रथम मी ज्ञाती बांधवांनी माझी तेली बांधवांनी माझी तेली सेवा समाज संस्थेचे अध्यक्ष म्हणून गेली सलग १० वर्षे निवड करून संस्थेचे व मुंबईतील तेली बांधवांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल समाजाचे ऋण व्यक्त करतो.समाज संस्थेवर १९९७ साली माझी अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यावर मी माझे सर्व सहकारी /कार्यकारणी सदस्य यांना बरोबर घेऊन त्यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवत आलो आहे.

संस्थेचे आजपर्यंत ४५०० सभासद झाले आहेत.त्याचं प्रमाणे वधू वर सूचक मंडळातर्फे २००० च्यावर सभासद नोंदणी झाली आहे.मुंबईत दोन वेळा भव्य वधू-वर मेळावे घेतले.मेळाव्यास उत्तम प्रतिसाद मिळाला.या माध्यमातून ५०० च्या वर विवाह जुळून विवाह पार पडले.स्वजातीय अपंग वधूवर मेळावा, तसेच सर्व जातीय अपंग वधूवर मेळावा आयोजित केले.त्याप्रमाणे संस्थेच्या सभागृहात ५० मुलांमुलीचे छोटे मेळावे आयोजित केले जातात.वधू वर सूचक मंडळाचे पदाधिकारी दर मंगळवार व शुक्रवार सांय ५ ते ८ वेळेत उत्तम प्रकारे मार्गदर्शन करतात.दर वर्षी संस्थे मार्फत जेष्ठ ज्ञाती बांधव आणि विद्यार्थी गुणगौरव,कला क्रिडा मध्ये प्राविण्य मिळालेल्यांचा सत्कार सोहळा घेण्यात येतो.गरीब विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे योग्य मदत केली जाते.ज्ञाती बंधू श्री.उमेश हासोळकर यांच्या मार्गदर्शना खाली कराटे क्लासेस चालविला जातो.अध्यात्मिक स्वाध्याय कै.श्री.पांडुरंग (दादा) आठवले शास्त्री यांचे दर बुधवारी गीता प्रवचन कॅसेटद्वारे दाखविली जाते.महिलांसाठी महिला विभागाच्या अध्यक्षा सौ.रत्न महाले स्वंयरोजगार,हळदी-कुंकू इ.सेवाभावी उपक्रम राबवितात.कार्यालय आणि सभागृहाचे अधिक आकर्षित नुतनीकरण केले आहे.सभागृह ११० व्यक्ति आसन क्षमतेचे असून अल्प दरात सभा,साखरपुडा,लग्न,नामकरण विधी,वाढदिवस,मुंज,शैक्षणिक कार्यक्रम व इतर धार्मिक कामासाठी उपलब्ध आहे.तसेच समाज समाज संचालित श्री.विश्वेश्वर सहकारी पत संस्थेचे चेअरमन श्री.शिवाजी झगडे आणि सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली गरजुना आर्थिक मदत,अल्प व्याज दरात कर्जाद्वारे केली जाते.तसेच श्री संताजी उत्साही मंडळाचे अध्यक्ष श्री.जनार्दन गवाणकर आणि कार्यकारी मंडळातर्फे श्री संताजी ची पुण्यतिथी,महिलांकरिता परंपरागत संस्कृती जोपासण्याचे आणि त्यांच्या समस्या,अंधश्रद्धा निर्मुलन,हळदी कुंकू इ.कार्यक्रम राबविले जातात. संस्थेपुढे श्री संताजी महिला उदयोग आणि संताजी सह. हौसिंग सोसायटी हे नियोजित उपक्रम आहेत.वरील प्रमाणे अनेक कार्यक्रम राबवून संस्थेची प्रगती करत आर्थिक बाजू मजबूत करून १५ लाखांचा स्वनिधी जमा आहे.आमच्या कार्य काळात संकल्पातील संस्थेच्या इमारती साठी जागा मिळविण्याचे प्रयत्न चालू आहेत.

शासनाकडून ओ.बी.सी. समाजासाठी मिळणारी सवलत व फायदे मिळविण्यासाठी समाज संघटन सहकार्य अती मोलाचे आहे. समाज शिक्षणात प्रगती पथावर आहे.आपण अधिक संघटीत होऊन समाज उन्नतीसाठी संघर्ष करून,न्याय हक्क मिळविण्यासाठी आपल्या संस्थे तर्फे आपणास विनंती करीत आहोत कि जे सभासद नसतील त्यांनी सभासद होऊन आपल्या योग्यतेप्रमाणे संस्थेस सहकार्य करून समाज सेवा करावी. आपण सर्वांना संस्थे तर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन,आपण सर्वांना उदंड आयुष्य मान,सुख,शांती लाभो ईश्वर चरणी प्रार्थना करून मनोगत पूर्ण करतो.

समाज सेवा हीच खरी ईश्वर सेवाजय संताजी

श्री.विनायक पांडुरंग कुवेसकर
अध्यक्ष

वधु- वर पालक परिचय मेळावा :

आंतरजातीय अपंग वधु- वर मेळावा :

ज्येष्ठ ज्ञाती बांधवांचा हृदय सत्कार:

कायदेविषयक सल्ला केंद्र उद्घाटन प्रसंगी :

समाजातील वैद्यकिय क्षेत्रातील बांधवाशी चर्चासत्र :

भावपूर्ण श्रद्धांजली :

कै.श्री.नामदेव वि.कांदळगांवकर
जन्म: दि.१५ ऑगस्ट १९२४
मृत्यू: दि:६ जुलै २००८


संस्थेचे संस्थापक कै.श्री.नामदेव वि. कांदळगांवकर या महान समाज सेवकाची ओळख अपना सर्वांना च आहे.त्यांनी आपल्या जीवनात समाज सेवेसाठी जो त्याग केलेला आहे. त्याची फलश्रुती म्हणून आज आपल्या संथेची घोडदौड चालू आहे. तसेच समाज उत्कर्षासाठी आर्थिक मदत अत्यंत गरजेची आहे.ही काळानुरूप गरज लक्षात घेऊन श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढीची स्थापना त्यांनी आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने सन १९६६ साली केली त्याचा आज आपण वटवृक्ष झालेला पाहत आहोत.समस्त समाज बांधव अधिकाराने आपल्या आर्थिक गरजांसाठी हक्काने या संस्थेकडे येतो. त्यांच्या जीवन कार्याबद्दल बरेच काही अभिमानाने सांगण्यासारखे आहे. कै.श्री.नामदेव वि. कांदळगांवकर हे रिझर्व बँकेत अधिकाऱ्यांच्या पदावर काम करत असून सुद्धा समाज कार्यातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.अशा महान व्यक्तिमुळेच संघटना मोठया होतात. आणि म्हणूनच आपण सर्व आज अभिमानाने तेली सेवा समाज,मुंबई, श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित,मुंबई व श्री संताजी उत्साही मंडळ,मुंबई या संस्थेच्या उत्कर्षाचे पाईक आहोत वरील तिन्ही संस्थाचे ते संस्थापक होते.

अशा या थोर समाज सेवकाला आमची भावपूर्ण श्रद्धांजली त्यांची पुण्यस्मृती आम्हास नेहमीच स्फूर्तीदायक ठरेल.