दूरध्वनी - ०२२-२४९२१८२७
तेली सेवा समाज, मुंबई (स्थापना :१९४९)
(धर्मादाय आयुक्त नोंदणी क्र. ए -१२०३ (मुंबई) दि .२९/४/१९५३)
आमच्याविषयी
६/३६ खिमजी नागजी चाळ,सेनापती बापट मार्ग,मुंबई ४०००१३

माननीय समाज बंधू-भगिनी व हितचिंतक यांस,

परस्पर सहकार्याने संघटना व बंधुभाव निर्माण करून समाजाची विविध प्रकारे निःस्वार्थ सेवा करणे हे संस्थेचे ध्येय आहे,समाजाची सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक,आर्थिक व राजकीय क्षेत्रात प्रगती व्हावी असा संस्थेचा दृष्टीकोन आहे.


तेली सेवा समाजातर्फे व्यायामशाळा, बँड पथक, तसेच श्री. ना.स. जिराडकर, (एम.ए.) (एल.एल.बी) यांच्या संपादकत्वाखाली ’सेवक’ मासिकाचे प्रकाशन केले. दूरवर पसरलेल्या आपल्या समाजाला सुसंघटीत करून विचारांची देवाणघेवाण करणारे व समाज जागृतीचे एक अंग आर्थिक अडचणीमुळे बंद करावे लागले. “सेवक” या मासिकातून समाजाचे एक सभागृह असावे असा प्रयत्न सन १९५२ पासून करण्यात आला होता. या प्रयत्नांचे यश म्हणजे तेली सेवा समाजाने कार्यकर्त्यांच्या चिकाटीने व श्रमदानाने बांधलेले छोटेसे सभागृह हे होय. आज या सभागृहाचा समाज बांधव,हितचिंतक,श्री संताजी उत्साही महिला मंडळ,श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित इत्यादि कडून सतत वापर होत आहे.

भक्तराज श्री संताजी महाराज जगनाडे यांचा पुण्यतिथी महोत्सव मुंबईत वेगवेगळ्या संस्थामार्फत ठिकठिकाणी साजरा होत असे.त्या सर्व उत्सवांचे सन १९५४ सालांत कै.ऋक्मांगद राणोजी काळे यांनी एकसुत्रीकरण करण्यासाठी प्रयत्न केला, त्यास तेली सेवा समाजाने सहकार्याचा हात देऊन समाजाची धार्मिक कार्यातील आर्थिक बचत करून समाजात विश्वासाचे व सहकार्याचे वातावरण उत्पन्न करण्याचा सतत प्रयत्न करीत आहे. हे आपणास दर वर्षीच्या उत्सवातून प्रत्ययास आले असेलच.

तेली सेवा समाज,मुंबई तर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम
  • श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित,मुंबई : तेली सेवा समाज,मुंबई संस्थेने समाजातील गरीब व गरजू समाज बांधवांकरीता त्यांच्या मुलभूत गरजा भागविण्याकरिता व सावकाराच्या जाचातून मुक्त करण्याकरीता श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित ची स्थापना १९६६ साली केली.यातून लोकांना अल्पबचतीची सवय लागण्यात येऊन अल्प व्याज दराने कर्ज वाटप करण्यात येते.संस्थेची सभासद संख्या ७८९९ एवढी असून संस्थेची उलाढाल १६ करोड ९४ लाख ४८ हजार ५४८ रु एवढी आहे.संस्थेची जोगेश्वरी येथे एक शाखा आहे व लवकरच मालाड पूर्व येथे पतपेढीची शाखा सुरु होणार आहे.तरी सर्व ज्ञाती बांधवांनी आपल्या पतपेढीचे सभासद व्हावे हि विनंती.
  • ज्ञाती प्रमाणपत्र : जिल्हाधिकारी/तहसिलदार कार्यालयाकडून जातीचे प्रमाण पत्र मिळवण्याकरीता तेली समाजाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते.म्हणून आपल्या संस्थेकडून जातीचे प्रमाणपत्र दिले जाते.
  • वधूवर सूचक मंडळ : समाजच्या माध्यमातून वधूवर सूचक मंडळातील कार्यकर्ते दर मंगळवार व शुक्रवार या दिवशी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत लोअर परेल येथे समाजाच्या कार्यालयात हजार राहून समाज बांधवांना योग्य त्या स्थळांचे मार्गदर्शन करतात व नवीन स्थळांची नोंद सविस्तर माहिती घेतात.तसेच त्रेमासिक वधूवर मेळावा आयोजित केला जातो याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी.
  • ज्युडो-कराटे प्रशिक्षण : समाजातील व विभागातील विद्यार्थी/नागरीकांकरीता अल्पदरात ज्युडो-कराटे प्रशिक्षण दिले जाते.
  • श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव : श्री संताजी उत्साही मंडळ यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. तसेच या संस्थे मार्फत मागील कित्येक वर्ष स्त्रियांकरिता हळदी-कुंकू व श्रावणोत्सव साजरा केला जातो. व या मार्फत व या मार्फत स्त्रियांमध्ये जागृतीचे काम सातत्याने पार पडले जात असून यातूनच महिला कार्यकर्त्यांचा कल समाज कार्याकडे वाढत आहे.
  • तेली सेवा समाज महिला आघाडी :महिला मंडळ हे फार पूर्वीपासून समाजात कार्यरत आहे.महिला मंडळाच्या माध्यमातून श्रावणोत्सव,मंगळागौर,जिवंतिका पुजन,हळदीकुंकू सभारंभ व वधुवर मेळावे मोठ्या उत्साहात व यशस्वीरित्या आयोगीत केले जातात.
  • अल्प दरात संस्थेचे सभागृह :संथेच्या सभागृहामध्ये संस्थेने अल्प दरात सभा संमेलने,सांस्कृतिक कार्यक्रम व साखरपुडा, लग्न सोहळा, नामकरण सोहळे या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सभागृहाची आसन क्षमता १०० इतकी आहे.
  • विद्यार्थी गुणगौरव सोहळा : संस्थेमार्फत माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयीन परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या तसेच कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो.याच सोहळ्यात जेष्ठ समाज कार्यकर्ते व जेष्ठ समाजबांधव यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी,तसेच समाजातील नवीन पिढीला जुन्या कार्यकर्त्यांची व त्यांच्या कार्याची ओळख होण्यासाठी ‘जेष्ठ समाज कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा’आयोजित करण्यात येतो.
  • अध्यात्मिक कार्यक्रम : संस्थेतर्फे स्वाध्याय,भजने व किर्तने यांचे कार्यक्रम आयोगीत करण्यात येतात.